आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्या हुआ तेरा वादा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात ‘अच्छे दिन आने वाले हैं’ अशी ग्वाही देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात, सर्व राज्यांना, सर्व वर्गांना खुश करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणांचा पाऊस पाडला असला, तरी महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देत, जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशभरात अमलात येणार्‍या विकासाच्या योजनांची जंत्रीच वाचून दाखवली. पण जागतिक मंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याची सबब देत, लोकप्रिय निर्णयांची जनतेने फारशी अपेक्षा ठेवू नये, असे सांगून टाकले. कठोर निर्णय घेतल्याशिवाय अर्थव्यवस्था सुधारणार नाही.