आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मणी वृत्तीला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"या प्रवृत्तींना कोण आवरणार?' या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या लेखावर केदार कुलकर्णी यांचा प्रतिवाद (१० जून) वाचला. या पत्रात कुलकर्णी असे म्हणतात की, ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक ब्राह्मणशाही या शब्दांचा निष्कारण वापर करून वाद उकरण्याचा वागळेंचा प्रयत्न दिसतो आहे. आपल्या देशात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशी जातींची उतरंड होती. या उतरंडीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांमधील काही जातीयवादी ब्राह्मणी वृत्तींना फुले- शाहू-आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी विरोध केला होता. समतेसाठीचे सामाजिक लढे लढणाऱ्या बाबासाहेबांना सनातनी पुराणमतवादी ब्राह्मणी वृत्तीने विरोधच केला होता. ब्राह्मण समाजातील पुरोगामी, परिवर्तनवादी, बुद्धिजीवी, विचारवंतांची संख्या लक्षणीय आहे. थोडक्यात, ब्राह्मण जातीला विरोध नसून हा ब्राह्मणी वृत्तीला विरोध आहे.