आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीव शिक्षकपद असावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षकांना गरज भासेल तेव्हा रजा घ्यावी लागते. ती प्रासंगिक रजा असो अथवा अर्जित रजा किंवा वैद्यकीय रजा. रजेच्या कालावधीत त्यांच्याकडील अधिभार इतर शिक्षकांकडे सोपवण्यात येतो. आधीच पाहायला गेले तर प्रत्येक शिक्षकाकडचा असलेला अधिभार प्रमाणापेक्षाही अधिक आहे. त्यात रजा घेऊन गेलेल्या शिक्षकाच्या अधिभाराची भर पडते. त्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या!’ अशा म्हणीप्रमाणे अध्ययन - अध्यापनाचे कार्य पुढे रेटत राहते. अध्ययन-अध्यापन समाधानकारक होऊ शकत नाही. त्यासाठी ‘राखीव शिक्षक’असे पद निर्माण केलेले असेल तर... राखीव शिक्षकाची त्वरित तात्पुरती नियुक्ती रजा कालावधीतील शिक्षकाच्या रिक्त जागेवर करता येईल. त्यासाठी बेकार शिक्षकांची मदत घेता येईल. त्यांच्या हाताला काम मिळेल. मोबदल्यात त्यांना मानधनाचा लाभही होईल, जेणेकरून बेकार शिक्षकांची उपासमार थांबेल. रजेवर जाणार्‍या शिक्षकाने दोन दिवस पूर्वीच नियोजन करून आपली रजा मान्य करून घेणे बंधनकारक करावे लागेल. विहित नमुन्यात त्यांच्याकडील शिकवत असलेले वर्ग व चालू असलेला अध्यापनाचा सविस्तर तपशील लेखी ठेवावा लागेल. म्हणजे प्रशासनाला तसे नियोजन करण्यासाठी सोयीस्कर होईल. शैक्षणिक कार्यातही खंड पडू शकणार नाही. शैक्षणिक प्रक्रिया गतिमान राहील. बालकांना खरा शिक्षणाचा अधिकार प्राप्त होईल. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास यामुळे निश्चित मदत होईल.