आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्री शक्तीचा सन्मान करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज घरोघरी महालक्ष्मी बसवण्यात आलेल्या आहेत. महालक्ष्मीचा सण ग्रामीण आणि शहरी भागात आजही भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होतो आहे. लक्ष्मी देवतेची पूजा श्रद्धेनेच केली जाते. ही पूजा म्हणजे ईश्वरी रूप असलेल्या नारी शक्तीचे पूजन आणि आपले आध्यात्मिक माहात्म्यही आहे. या निमित्ताने समाजात आज महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत विचार होणे महत्त्वाचे आहे. आज आपण पाहतो की महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. हा अन्याय इतका उघड आहे की, टीव्हीवर त्याचे प्रच्छन्न प्रदर्शन होऊनही कोणी काही बोलत नाही. आज महिला अनेक क्षेत्र गाजवत आहेत, त्यांच्या कर्तृत्व आणि जन्माचा सत्कार होणे गरजेचे
आहे. यासाठी सरकारने कायदे बदलले असले तरी महिलांबद्दल आदर असणे महत्त्वाचे आहे.