आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक तरी टोलनाका बंद करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’ (31 जुलै) च्या भूमिका पानावरील ‘प्रतिवाद’मध्ये प्रा.कुणाल पाटील यांचे टोलनाक्यासंदर्भात पत्र वाचले. जालना ते वाटूरदरम्यान 100 किलोमीटरच्या आत तीन टोलनाके आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी तर झोपलेले आहेतच; परंतु ज्या व्यावसायिकांना या रस्त्यावरून जावे-यावे लागते, त्यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावे वाटते. जालना नगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या टोलनाक्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु न्यायप्रविष्टच्या नावाखाली प्रकरण प्रलंबित आहे. आता तरी दानवे यांनी या प्रकरणात सामान्य जनतेला न्याय द्यावा. तसेच राज्य शासनाने शंभर किलोमीटर अंतरातील एक टोलनाका बंद करावा.