आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muktvyaspith About Traffic Issue In Divya Marathi

वाहनांवर मोबाइल क्रमांक असावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहने पार्किंगची सुविधा नसल्यास लोक दुकानात जात नाहीत. वाहनचालक दुकानासमोर कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते. यासाठी पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. रस्त्यावरील नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर लावण्याच्या मोहिमेवर भर द्यावा. चारचाकी वाहनावर संबंधिताचा मोबाइल क्रमांक असावा. म्हणजे त्याच्याशी संपर्क साधून वाहनकोंडी सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच अपघात झाला तर या माेबाइलचा उपयोग होतोच. एखादा वाहनाचा चालक दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत असल्यास त्याच्या मालकासही कळवता येते. वाहने चोरीस जाण्याची शक्यताही कमी होईल. पार्किंगची समस्या जाणूनबुजून निर्माण केली जात आहे. यावर नियंत्रण हवे!