आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांची बेलगाम फी आकारणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षापासून शाळांच्या कारभारामध्ये अनेक गडबड घोटाळे झाले. त्यात आजपर्यंत शाळांकडून पालकांची भरमसाट लूट झालेली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात पोटाला चिमटा घेऊन, प्रसंगी कर्ज काढून मुलांना शिकवण्याची अत्यंत बिकट वेळ आली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. प्रत्येक शाळेची वेगवेगळी त-हा आहे. प्रवेश घेताना गलेलठ्ठ डोनेशन घेतले जाते आणि त्या डोनेशनची रक्कम मनाला येईल ती लावतात. आता तर राज्यात सर्वत्र मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढलेले आहे. पूर्वीची पाटी अन् पेन्सिल तर शाळेतून गायबच झालेली दिसते. त्यामुळे वह्या पुस्तकांचा खर्च पण वाढला आहे. बहुतांश शाळांना अनुदान मिळत असूनसुद्धा भरमसाट डोनेशन का घेतले जाते ? याची चौकशी शिक्षण खाते कधीच करत नाही.