आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमजुरांना पेन्शन द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशाची प्रगती व्हावी असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिले असून या पत्रातील काही मुद्द्यांवर विचार व्हावा, अशी विनंती केली आहे. देशातील महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जास्तीच्या संपत्तीचे विवरण घ्यावे. त्यांच्याकडील अतिरिक्त संपत्ती शासनाच्या तिजोरीत जमा करावी. तालुका आणि प्रत्येक जिल्हास्तरावर उद्योजकांना उद्योग काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत खासगी पण मोठ्या प्रकल्पांकडून पाहणी अहवाल मागवून त्याचा अभ्यास करावा. त्यावरील उपाययोजनाही सुचवण्यास सांगावे. गरीब वर्गातील मुलांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करावी. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ५०० रुपये आणि ६० वर्षांवरील शेतमजुरांना दरमहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी.