आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातसमयी मदत करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही रोज वाढ होत आहे. वर्तमानपत्र असो की दूरचित्रवाणी, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या बातम्या आवर्जून दाखवल्या जातात. बेदरकारपणे वाहन चालवणे, पुरेसा अनुभव नसणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे, वाहनांची नीट काळजी न घेणे यासारख्या कारणांमुळे अपघात घडतात. भारतात अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. जगात सर्व देशांत मिळून रस्ते अपघातात जितके मृत्यू होत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू एकट्या भारतात होतात. अपघात झाल्यानंतर कारण नसताना त्रास नको म्हणून पूर्वी लोक मदत करत नव्हते. आता मात्र कायद्यात बदल झाल्याने जखमींना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे.
सतीश कलंत्री, ई-मेलद्वारे