राज्यात पावसाने ओढ दिली आहे. पावसाअभावी अनेक हेक्टर्सवरील पिके जळून गेलेली आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, जनावरांना चारा नाही. जनावरे बेवारस म्हणून सोडावी लागत आहेत. अद्यापही छावण्या तयार झालेल्या नाहीत. धान्य तसेच भाजीपाल्याचे भाव परवडेनासे झालेले आहेत. राजकीय पातळीवर दुष्काळासाठी काही हालचाल जरूर दिसते, पण ही मदत सर्वांपर्यंत पोहोचणार आहे का? हे दौरे म्हणजे राजकीय कर्मकांडाचा भाग ठरू नयेत. यासाठी राजकारण वगळून सर्वच पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अशा स्थितीत महागाईने डोके वर काढले आहे. कांद्याने डोळ्यात पाणी आणलेच आहे. शिवाय तूर डाळीसह इतर धान्ये व भाजीपालाही महागला आहे. तेव्हा सरकारने महागाई कमी करावी.
एस. एन. कुंभार, कुर्डूवाडी, सोलापूर.