आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक साठीत चढले बोहल्यावर, रवीना खुराणा यांच्याशी लग्नगाठ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर / नवी दिल्ली - रामटेक येथून खासदार राहिलेले काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांनी वयाच्या साठीत लग्न केले आहे. दिल्लीतील आलीशान हॉटेल मौर्य शेरेटनमध्ये हा लग्न समारंभ पार पडला. यामध्ये मोजक्याच मित्रमंडळी आणि नातेवाइकांना निमंत्रण देण्यात आले होते. काँग्रेसचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या लग्नात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेते मंडळींनी सुद्धा उपस्थिती नोंदवली. रवीना खुराणा असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

मुकुल वासनिक आणि रवीना खुराणा यांच्या लग्नात उपस्थिती लावलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत, मनिष तिवारी, अहमद पटेल, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. यासोबतच पक्षाच्या काही नेत्यांनी ट्वीट देखील केले. याच ट्विटनंतर लोकांना त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  मनिष तिवारी यांनी दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

कोण आहेत मुकुल वासनिक


काँग्रेसचे दिग्गज नेते आणि बुलडाणा येथून तीन-तीन वेळा खासदार राहिलेले बाळकृष्ण वासनिक यांचे मुकुल वासनिक पुत्र आहेत. 1984 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा मुकुल वासनिक यांचे वय केवळ 25 वर्षे होते. त्यामुळे, त्यांना संसदेची पायरी चढणारे सर्वात युवा खासदार म्हणूनही ओळखले जाते. यानंतर ते तीन वेळा बुलडाणा येथून खासदार बनले. तर 2009 मध्ये नागपूरच्या रामटेक येथून 2009 मध्ये ते खासदार झाले होते. काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना ते सामाजिक आणि न्यायमंत्री होते. सामाजिक कार्य आणि राजकीय आयुष्यातील व्यस्ततेमुळे मुकुल वासनिक यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. पण, वयाची साठी ओलांडल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.