आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारावर बेताल मुलायम म्हणाले- मुले चुका करत असतात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरादाबाद (उत्तर प्रदेश)- मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा बजावण्यात आल्यासंदर्भात बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी मुलायमसिंह यांनी राजकीय मर्यादांची पातळी सोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बेताल वक्तव्य करताना मुलायम म्हणाले, की बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा बजावावी का? ती मुले आहेत. त्यांच्याकडून चुका होत असतात.
मुंबईतील शक्तीमिल परिसरात फोटोजर्नलिस्ट तरुणी आणि टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या ठिकाणी या आरोपींनी अनेक तरुणींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. अतिशय पाशवी पद्धतीने हे आरोपी तरुणींवर बलात्कार करीत होते. तरीही मुलायमसिंह यांनी या आरोपींची पाठराखण केली आहे. महंमद कासिम शेख, महंमद सलिम अन्सारी आणि विजय जाधव यांना या प्रकरणी फाशी झाली असून सिराज रहमान खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रचार सभेला संबोधित करताना बेताल मुलायमसिंह म्हणाले, की मुले आणि मुली... त्यानंतर मतभिन्नता होते आणि मुली सांगतात त्यांच्यावर बलात्कार झाला. खरंच बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी का? ती मुले आहेत. ते चुका करू शकतात. दोन-तीन जणांना मुंबईत फाशीची शिक्षा झाली आहे. आम्ही असा कायदा बदलण्याचा प्रयत्न करू. चुकीच्या तक्रारी दाखल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारा कायदा आणू.
दरम्यान, मुलायमसिंह यांच्या बेताल वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षाचे नेते आझम खान यांनी कारगिल युद्धाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून रोष आढवून घेतला होता.
काय म्हणाले होते आझम खान.... वाचा पुढील स्लाईडवर