Home | News | Multi-dimensional 'actor' Girish Karnad passed away

बहुआयामी ‘खेळिया’ गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड; महाराष्ट्रासह देश शोकव्याकूळ

वृत्तसंस्था, | Update - Jun 11, 2019, 08:54 AM IST

२३ व्या वर्षी पहिले नाटक लिहिले, शिकागोतील अध्यापकाची नोकरी सोडून चित्रपटांत आले अन् साहित्याचा आवाज बनले

 • Multi-dimensional 'actor' Girish Karnad passed away
  मागील वर्षी एका कार्यक्रमात ते गळ्यात फलक अडकवून आले होते. त्यावर लिहिले होते - मी शहरी नक्षली आहे.

  बंगळुरू - लेखक अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि नाट्यकलावंत गिरीश कर्नाड (८१) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने बंगळुरू येथे निधन झाले. मे महिन्यातच त्यांनी आपला ८१ वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या धारदार लेखणीमुळे साहित्य आणि चित्रपटांचा दमदार आवाज म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी ‘ययाति’ हे पहिले नाटक १९६१ मध्ये कन्नड भाषेत लिहिले होते. कालांतराने त्याचे इंग्रजीत भाषांतर झाले. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण मराठीत झाले. ते १४ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कर्नाटकातील धारवाड येथे राहण्यासाठी गेले. तेथेच ते कन्नड भाषेत पारंगत झाले. कर्नाटकातील कला महाविद्यालयातून त्यांनी १९५८ मध्ये पदवी घेतली. त्यानंतर १९६० मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. शिकागो विद्यापीठात अध्यापक म्हणूनही काही काळ त्यांनी काम केले. मात्र या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. भारतात परतल्यानंतर त्यांनी साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात कामास सुरुवात केली. १९७८ मध्ये आलेल्या ‘भूमिका’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

  किस्सा-१: आयरिश लेखकाचे स्केच बनवून पाठवले होते : गिरीश यांनी आपल्या एका लेखात म्हटले की, १७ वर्षांचा होतो तेव्हा मी आयरिश लेखक सीन ओ केसी यांचे स्केच बनवून पाठवले होते. त्यांनीही मला पत्र पाठवले त्यात लिहिले होते- मी हे सर्व करण्यात वेळ वाया घालवणार नाही. असे काही करेन, ज्यामुळे लोक माझा ऑटोग्राफ मागतील. पत्र वाचल्यानंतर मी असे करणे बंद केले.तेव्हापासून माझ्या आयुष्यात बदल झाला.

  किस्सा-२: आजारपणात नाकात नळी असूनही केले चित्रीकरण : गिरीश कर्नाड यांनी ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात काम केले आहे. यात त्यांनी डॉ. शेणॉय ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगवेळी ते आजारी होते. चित्रपटातील त्यांच्यावरील प्रत्येक दृश्य इन डोअर चित्रित करण्यात आले. कारण आजारपणामुळे त्यांना सूर्यप्रकाशात जाण्यास बंदी होती. शूटिंगवेळी त्यांच्या नाकात नळीही लावण्यात आली होती.

  एफटीआयआय संचालक, इतरही मानाची पदे भूषवली
  गिरीश कर्नाड यांनी १९७४-७५ मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषवले होते. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते.

Trending