आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Multinational Company Employee And 10th Student Gang Rapd In Delhi News And Updates

धक्कादायक: 10वीची विद्यार्थिनी व बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचारी तरुणीवर सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - द्वारका परिसरात एका तरुणीने आपल्या दोन सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. आरोप आहे की, सहकाऱ्याने तिला आपल्या कारमध्ये लिफ्ट दिली होती. तर दुसरा आरोपी आधीपासूनच त्या कारमध्ये स्वार होता. दोघांनी तरुणीला कोल्डड्रिंक आणि सँडविच दिले. यानंतर ती बेशुद्ध झाली. नंतर जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला वसंत कुंज परिसरात असल्याचे आढळले. कशीबशी तिने आपले घर गाठून कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी बिरजू (25 ) आणि विनोद (31) यांना अटक केली आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

सूत्रांनुसार, शनिवारी तरुणी आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाली होती. यादरम्यान विनोदने तिला लिफ्ट दिली. तरुणीचा आरोप आहे की, तिला सँडविच आणि कोल्ड ड्रिंक देण्यात आले, जे खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर तरुणीला एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले, तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी तरुणीला बेशुद्धावस्थेत वसंत कुंजमध्ये फेकून फरार झज्ञले. पीडिता आपल्या कुटुंबासोबत रविवारी पोलिस स्टेशनला पोहोचली आणि याबाबत तिने तक्रार दिली. यानंतर पोलिस पथकाने आरोपींना अटक केली. दुसरीकडे, कल्याणपुरीमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

 

10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
आरोपीने पिझ्झा खरेदी करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला आपल्या खोलीत बोलावले. येथे त्याने आपल्या आणखी 3 साथीदारांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपीने याबाबत कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. सूचना मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीसहित चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिस म्हणाले, यातील मुख्य आरोपी हा पीडित मुलीच्या घरमालकाचा 28 वर्षीय मुलगा असून तो विवाहित आहे. एका आरोपीचे वय 19 वर्षे आहे, तर तो कार वॉशिंगचे काम करतो. आणखी दोन आरोपींचे वय 30 वर्षांजवळ आहे. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनेची माहिती शुक्रवारी मिळाली होती, पीडित कुटुंबाने आपल्या जबाबात सांगितले की, आरोपींमध्ये त्यांच्या घरमालकाचा मुलगाही सामील आहे. एक सीनियर ऑफिसर म्हणाले की, घरमालकाच्या मुलाने विद्यार्थिनीला पिझ्झा खाण्याचे आमिष दाखवून खोलीत नेले. तेथे त्याचे आणखी 3 मित्रही आले. ते सर्व दारूच्या नशेत होते. अधिकारी म्हणाले की, त्यांनी विद्यार्थिनीवर कथितरीत्या बलात्कार केला आणि घटनेबाबत कुणालाही काही सांगितल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली. पीडित मुलीची आई कामावरून घरी परतल्यावर तिने आपबीती सांगितली. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो व भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...