Home | Khabrein Jara Hat Ke | Mum accused of trying to kill her critically ill baby by pouring BLEACH down his feeding tubes

अचानक बिघडली मुलाची तब्येत तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचली आई, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बोलावले पोलिस आणि महिलेला झाली अटक 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 02:40 PM IST

गंभीर आजाराचा सामना करत आहे 13 महिन्याचा मुलगा, नळीने घ्यावा लागतो श्वास आणि जेवण

 • Mum accused of trying to kill her critically ill baby by pouring BLEACH down his feeding tubes

  पर्थ. ऑस्ट्रेलियामध्ये राहणा-या एका महिलेने आपल्या तान्ह्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती बिघडल्यानंतर तिला आपल्या चुकीची जाणिव झाली आणि ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉसिपिटलमधून बातमी मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पोलिसांनी महिलेला अटक केली. सध्या महिलेविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तिच्याविरुध्द सुनवाई सुरु आहे.


  फीटिंग ट्यूबच्या माध्यमातून केला विष देण्याचा प्रयत्न...
  - ही घटना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील आहे. येथे राहणा-या ब्रूक एवलिन (26)ने आपल्या 13 महिन्याचा मुलगा विलियमला ब्लिच पावडर देऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने मुलाच्या फीडिंग ट्यूबवर (दूध पाजणा-या नळीवर) केमिकल लावला होता.
  - हे प्रिमॅच्यूअर बाळ होते आणि वेळेच्या 14 आठवड्यांपुर्वीच त्याचा जन्म झाला होता. तसेच त्याला दुर्मिळ आजारही होता. या आजारामुळे त्याला नळीच्या माध्यमातून श्वास आणि जेवण घ्यावे लागत होते.
  - गंभीर आजार असल्यामुळे डॉक्टरांनी बाळाला सतत देखरेखीत ठेवत काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. बाळाला क्रिसमसच्या एक दिवसपुर्वीच हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली होती. यामुळे चार दिवसांनंतरच 29 डिसेंबरला महिलेने 29 डिसेंबरला बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

  पुढी वाचा सविस्तर...

Trending