आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात आढळली विचित्र बाटली, पाहून घाबरून गेले कपल.. आत मांसाचा तुकडा पाहून लगेचच केला पोलिसांना फोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 सिस्टन - इंग्लंडमध्ये एक कपल घराच्या कपाटामध्ये सापडलेली बाटली पाहून प्रचंड घाबरून गेले. त्या बाटलीमध्ये असलेल्या  लिक्विडमध्ये डोळ्यासारखे काहीतरी तरंगत होते. तसेच त्यात स्टेपल केलेला मांसाचा तुकडाही होता. ते पाहिल्यानंतर प्रचंड घाबरल्याने त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि सोशल मीडियावर पोस्टही केले. महिलेचे म्हणणे आहे की, याठिकाणी तिच्याबरोबर अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. या बाटलीत जादू टोण्याशी संबंधित काहीतरी आहे असे त्यांना वाटले. 


घाबरून गेले कपल 
- लीसेस्टरशायर येथील जेम्स आणि कॅलिघ रेटक्लिफ नवीन घरात राहायला आले. त्यांना त्याठिकाणी विचित्र घटना जाणवल्या. 
- त्यात त्यांना घरात एकाठिकाणी एक बाटली सापडली. त्यात गुलाबी रंगाच्या लिक्विडमध्ये डोळ्यासारखे काहीतरी तरंगत होते आणि त्याला मांसाचा तुकडा लावलेला होता. 
- हे पाहताच कपल घाबरून गेले. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी यात काहीही करू शकत नसल्याचे म्हटले. 


महिलेने म्हटले-घरात घडतात विचित्र घटना 
कॅलेघने सांगितले की, ती कपडे धुवत असताना तिला कोणीतरी मागून गेल्यासारखे वाटले. पण पाहिले तर त्याठिकाणी कोणीही नसते. एकदा लाइट आपोआप बंद सुरू होत होते. आत कोणीही नव्हते. असे अनेकदा होते पण कोणी दिसत नाही, असे तिने सांगितले. 


तांत्रिक म्हणाला जादू-टोणा
महिलेने फेसबूकवर हे सर्व सांगितले. त्यावर लोकांनी हा एकप्रकारचा जुना लॅम्प असल्याचे सांगितले. जादू टोणा करणाऱ्याने संपर्क साधला आणि त्याने हे सर्व तांत्रिक क्रियेचे सामान अशल्याचे सांगितले. महिलेला अजूनही नेमके काय ते कळत नाही. या सर्वामुळे ती प्रचंड तणावात आहे. मुलांची काळजी असल्याचे तिचे म्हणणे आहे. 


('सोशल व्हायरल सीरीज' अंतर्गत ही स्टोरी याठिकाणी देत आहोत.)

बातम्या आणखी आहेत...