आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्लास्गो - स्कॉटलंडमध्ये एका मुलाने खेळता खेळता असे काही केले की त्याच्या आईला त्याचे केस जवळपास 23 वेळा धुवावे लागले. मुलाने त्याच्या केसांवर खूप सारे व्हॅसलीन लावले होते. त्याच्या आईने ते काढण्यासाठी एक प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही तिच्यावरच उलटला. महिलेने या मुलाच्या डोक्यावर पीठ लावले. पण त्यामुळे त्याची आणखीच वाईट अवस्था झाली.
मुलगा म्हणाला, आई बघ मी काय केले
- ही स्टोरी आहे 23 वर्षांची एक महिला जॅमिली स्टिव्हर्टची तिचा तीन वर्षांचा मुलगा थॉमसने केसांना पेट्रोलियम जेली लावून घेतली. ते पाहून जॅमिलीला धक्का बसला. मुलाने शाळेच जायच्या एक दिवस आधी स्टायलीश दिसण्यासाठी असे केले होते.
- जेमिली म्हणाली की, तिने सहा तास ती पेट्रोलियम जेली केसावरून काढण्याचा प्रयत्न केला. पण ती वॉटरप्रूफ होती. तिने त्यासाठी शॅम्पू, कंडिशनर आणि वॉशिंग पावडरही ट्राय केले. पण कशाचाही फायदा झाला नाही.
- कंटाळून तिने इंटरनेटची मदत घेतली. टाल्कम पावडरच्या मदतीने व्हॅसलीन काढता येते हे तिने वाचले. पण पावडर नसल्यामुळे तिने पीठ वापरले. पण त्याने तिच्या अडचणी जास्तच वाढल्या. कारण त्याची वेगळीच पेस्ट बनली आणि ते चिकट बनले.
- महिलेने 23 पेक्षा जास्त वेळा शॅम्पू आणि इथर साहित्याने केस धुतले पण चिकटपणा कमी झालाच नाही. त्याची अवस्था पाहून जॅमिलीला रडू येत होते.
- शाळेत पाठवण्यासाठी आईने शक्कल लढवली. टोपी घालून शाळेत पाठवण्याबाबत मॅडमशी बोलते अशी जॅमिली म्हणाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.