आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mum Posts Thank You Note To A Teenage Boy Who Did Something Amazing For Her Daughter

बसमध्ये अचानक पीरियड्स आल्याने शरमेने पाणी झाली स्कूलर्गल; अनोळखी तरुणाने केले असे काही, हैराण झालेल्या मुलीच्या आईने फेसबूकवर लिहिली भावूक पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'सोशल व्हायरल सिरीझ अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशा काही स्टोरीज ज्याबद्दल आपणही जाणून घ्यायला हवे.)

 

स्पेशल डेस्क - एका शालेय विद्यार्थिनीच्या आईने फेसबूकवर लिहिलेली भावूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तिची मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूलबसने घरी येत होती. त्याचवेळी अचानक तिला पीरियड्स आले. शरमेने पाणी-पाणी झालेली ही मुलगी काहीच करू शकत नाही. त्याचवेळी एका अनोळखी तरुणाने तिची मदत केली. त्या मुलाच्या मदतीने विद्यार्थिनीची आई इतकी भावूक झाली की तिने आपले मनोगत फेकबूकवर शेअर करत त्याला धन्यवाद म्हटले आहे. लोक तिच्या या फेसबूक पोस्टमध्ये असलेल्या मुलाचे तोंडभर कौतुक करत आहेत. 


इतक्या सहजरित्या केली मदत...
- फेसबूक पोस्ट लिहिणाऱ्या महिलेची ओळख समोर आली नाही. तरीही तिने लिहिल्याप्रमाणे, 'माझी मुलगी आज शाळेतून बसने परत येत होती. त्याचवेळी तिला अचानक मासिक पाळी सुरू झाली. यामुळे तिच्या पॅन्टच्या मागून डाग पडले होते जे सर्वांना दिसत होते. परंतु, मुलीला याची जाणीव नव्हती.'
- 'माझ्या मुलीपेक्षा वयाने वर्षभर मोठा असलेला मुलगा त्याच बसमध्ये प्रवास करत होता. त्याला ती ओळखतही नव्हती. तोच तिला एका बाजूला घेऊन गेला आणि तिला सांगितले की तुझ्या पॅन्टच्या मागे डाग दिसत आहेत. दुसऱ्याच क्षणी त्याने आपले स्वेटर त्या मुलीला दिले. हा स्वेटर आपल्या कंबरेला बांधून घे. जेणेकरून कुणाला काहीच दिसणार नाही आणि तुला उतरताना त्रास होणार नाही.'


म्हणाला- मी समजू शको, मलाही बहिणी आहेत!
- 'घरी परतल्यानंतर तिने शरमेने काय हाल झाले होते ही गोष्ट मला सांगितली. सुरुवातीला तिने त्या मुलाकडून स्वेटर घेण्यासही नकार दिला होता. तेव्हा त्या मुलाचे उत्तर खूप सुंदर होते. तो म्हणाला, मी समजू शकतो. मलाही बहिणी आहेत. यात चुकीचे काहीच नाही.'
- पुढे महिलेने लिहिले, 'केवळ त्या मुलालाच नव्हे, तर त्याची आई असेल तर मी तिला देखील धन्यवाद देऊ इच्छिते. धन्य ती आई जिने आपल्या मुलावर इतके चांगले संस्कार केले. हल्लीच्या पिढीबद्दल खूप वाइट गोष्टी ऐकायला मिळतात. अशात अतिशय पॉझिटिव्ह घडल्याने मी ही स्टोरी शेअर करत आहे.' महिलेने ही पोस्ट शेअर करताच अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झाली.

 

बातम्या आणखी आहेत...