आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदृश्य मित्राशी बोलत राहायची चिमुकली, सांगायची आपल्या घरात कुणी तरी आहे; नेहमीच दुर्लक्ष करणाऱ्या आईला दिसले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही सत्यकथा 'कॉन्ट्रोव्हर्शियल क्लेम' या सिरीझ अंतर्गत प्रस्तुत करण्यात आली आहे. जगभरात वेळोवेळी अशा प्रकारचे दावे केले जातात जे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.)

 

हॅमिल्टन - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एक महिला इंटरनेटच्या माध्यमातून स्कॉटलंड येथील आपल्या जुन्या फ्लॅटची काही छायाचित्रे पाहत होती. याचवेळी तिला आपल्या रिकाम्या फ्लॅटच्या खिडकीवर असे काही दिसले की ती प्रचंड घाबरली. या महिलेला खिडकीवर कथित लहान मुलाचे भूत दिसले होते. तो चेहरा पाहून महिलेला तिच्या मुलीने काही वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. एकेकाळी ही महिला त्या फ्लॅटमध्ये आपल्या लहान मुलीसोबत राहत होती. आणि ती मुलगी नेहमीच तिला घरात लहान मुलाच्या भूताचे वर्णन करत होती. तेव्हा या महिलेने तिच्या सांगण्यावर कधीच लक्ष दिले नाही. मुलीने सांगितलेल्या सर्वच गोष्टी आठवल्या आणि प्रत्येक गोष्ट आठवून तिच्या अंगावर काटा आला.
नेहमीच अज्ञात मित्रासोबत बोलत बसायची मुलगी...


नेहमीच अज्ञात मित्रासोबत बोलत बसायची मुलगी...
> ही सत्यकथा साउथ लेंकरशायरमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय महिला ईलेन मॅकमोनॅगलची आहे. ती नुकतीच स्कॉटलंड सोडून इंग्लंडच्या हेमिल्टन येथे शिफ्ट झाली होती. तिने आपल्या नवीन घरात बसून गूगल स्ट्रीट व्यू च्या माध्यमातून आपले अलेक्झांड्रिया येथील जुन्या फ्लॅटचे फोटो पाहण्याचा प्रयत्न केला. फोटो झूम केले तेव्हा तिला खिडकीवर एका अज्ञात लहान मुलगा बाहेर पाहत असल्याचे दिसून आले. हे चित्र पाहून ती प्रचंड घाबरली. 
> कित्येक वर्ष आपली मुलगी एका अज्ञात मुलाच्या भूतासोबत बोलत असल्याचे सांगत होती. तिच्या म्हणण्यावर दुर्लक्ष करणाऱ्या आईला आता पश्चातापासह भीती वाटत होती. मुलीने सांगितलेले वर्णन तंतोतंत खरे निघाले होते. 5 वर्षांपूर्वी ईलेन आपली 3 वर्षांची मुलगी हॅलीसोबत त्या जुन्या घरात राहत होती. हॅली नेहमीच जॉनी नावाच्या मुलाचे नाव घ्यायची. तो आपल्या घरातच राहतो असे वारंवार तिने आईला सांगितले होते. 
> तेथे राहत असताना हॅलीने आई ईलेनला सांगितले होते, की आपल्या घरात एक लहान मुलगा जॉनी आणि एक माणूस सुद्धा राहतो. परंतु, ईलेनने तिच्यावर कधीच लक्ष दिले नाही. हॅली सांगायची की जॉनी उडी मारून तिच्या बेडवर यायचा आणि ते दोघे तासंतास खेळत राहायचे. ईलेन इतकी वर्षे आपली मुलगी खोटे बोलत आहे किंवा मनाने कहाण्या रचत आहे असे तिला वाटत होते. हॅलीने आपल्या काल्पनिक जगात तो मित्र बनवला असे ती समजत होती.


घरात घडल्या होत्या अशा घटना
महिला म्हणाली, 'जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मी गूगल स्ट्रीट व्यू पाहत होते. तेव्हा मला फ्लॅटच्या खिडकीवर एका लहान मुलाचा चेहरा दिसला. गूगल स्ट्रीट व्यूवर ही छायाचित्रे घर बदलण्याच्या वर्षभरानंतरची आहेत. अर्थात माझी मुलगी ज्या जॉनीचे सांगत होती तो हाच होता.' तिने सांगितल्याप्रमाणे, ती घरात राहत असताना बाथरुमचे लाइट अचानक बंद किंवा सुरू व्हायचे. मुलीने ठेवलेल्या खेळणी सुद्धा बाहेर मिळत होत्या. जणू कुणी खेळल्यानंतर तसेच ठेवून दिले. या व्यतिरिक्त मुलीचे पेपर्स, कलर्स आणि इतर साहित्ये सुद्धा अस्त-व्यस्त अवस्थेत राहायचे. त्या घरात काचेचे दार लावले होते. त्यामुळे, अनेकवेळा सावल्या इकडून तिकडे जात असताना दिसासचा. घरात नेहमीच एक विचित्र वास येत होता. ईलनने सांगितल्याप्रमाणे, ती लहान असताना तिच्यासोबतही असेच काही घडले होते. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसोबत वाढली. लहानपणी ईलेन अशा लोकांशी बोलायची जे अस्तित्वात नाही. या जगात नसलेल्या तिच्या आईने या गोष्टी तिला सांगितल्या होत्या. आपल्यासोबत लहानपणी जे घडले तेच आपल्या मुलीसोबतही घडले. परंतु, आपल्या लहानपणी किंवा आपल्या मुलीला त्या कथित भूतांनी कधीही नुकसान पोहोचवलेले नाही असे ईलेनने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...