आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे पाय अचानक झाले सुन्न, टेस्टमध्ये समजले मेंदूमध्ये आहेत 25 ट्यूमर, डॉक्टर म्हणाले, सहा महिनेही जगणार नाही, पण..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेशायर - इंग्लंडमध्ये एक महिला तिच्या मेंदूत 25 ट्यूमर असल्याचे समजले आणि प्रचंड घाबरली. डॉक्टरांनी ती फारतर 6-8 महिनेच जगू शकेल. त्यानंतर महिलेला कुटुंबाची काळजी जाणवायला लागली. तिने स्वतःच्या पातळीवर याचा उपचार शोधण्यास सुरुवात केली. इंटरनेटवर तिला काही खास उपचार मिळाले आणि तीन महिन्यांत तिच्या शरिरावरून सर्व लक्षणे संपली. 


पाय झाले सुन्न 
- ही स्टोरी इंग्लंडच्या बुरलँडमध्ये राहणारी महिला हैदी स्पेंस (45) यांची आहे. त्या पेशाने बिझनेस अॅनालिस्ट आहेत. हैदी यांचे पती डेवीड (39) इंजिनीअर आहेत. हे कपल दोन मुले विल्यम (7) आणि लुईस (4) बरोबर राहते. 
- हैदी यांच्या वाईट दिवसांची सुरुवात गेल्या वर्षी मदर्स डेला झाली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायाच्या संवेदना अचानक गेल्या होत्या. अनेक टेस्ट केल्यानंतर समजले की त्यांना चौथ्या स्टेजचा फुफ्फुसांचा कॅन्सर होता. 
- कॅन्सर त्यांच्या शरीरात पूर्णपणे पसरला होता. मेंदू आणी हाडांवरही कॅन्सरने हल्लाबोल केला होता. डॉक्टर म्हणाले की, त्यांच्या मेंदूमध्ये 25 ट्यूमर आहेत आणि त्या फारतर 6 - 8 महिनेच जगू शकतील. 
- डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचा आजार बरा होऊ सकत नाही. त्याच्या उपचारासाठी त्यांनी केमोथेरपीचा सल्ला दिला. पण हैदी यांचे डॉक्टरांच्या सल्ल्याने समाधान झाले नाही. 

त्यांनी स्वतःच्या पातळीवर उपचार शोधला 
- हैदी यांनी त्यांच्या पातळीवर उपचार शोधण्यास सुरुवात केली. त्यांना अगदी वेगळ्या पद्धतीच्या US टेस्टबाबत समजले. त्यात कोणती औषधे रुग्णासाठी सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतात हे समजते. 
- हैदी यांनी मँचेस्टरच्या विथिंग्टनमध्ये असलेल्या कॅन्सर ट्रिटमेंट सेंटरमध्ये ट्रायल बेसिसवर टेस्ट केली. या क्लिनिकमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी उपचार घेतलेला आहे. त्याठिकाणी झालेल्या टेस्टमध्ये समजले की, हैदी यांच्या 5 जीन्सवर अत्यंत वाइट परिणाम झाला आहे. त्यापैकी दोनवर उपचार शक्य होता. 
- त्यांना तिथे काही औषधे देण्यात आली. तसेच रेडिओथेरेपी करण्यासाठीही सांगण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि तीन महिन्यांत त्यांच्या शरीरातील ब्रेन ट्यूमरची लक्षणे पूर्णपणे निघून गेली. 
- अद्याप त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही पण त्यांचा कॅन्सर बराच नियंत्रणात आला आहे. त्यांच्या शरीरात आता आजाराची फार बाह्य लक्षणे नाहीत. 
- स्वत:चे जीवन वाचवण्यासाठी या टेस्टची मी आभारी आहे असे हैदी म्हणाल्या. कायम डॉक्टरचे म्हणणे ऐकायलाच पाहिजे असे गरजेचे नसल्याचेही त्या म्हणाल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...