Home | Khabrein Jara Hat Ke | Mum comes up with genius trick to keep her baby sleeping soundly while she grabs coffee and a shower

आई बाजूला जाताच रडायची एक महिन्याची मुलगी, आईने थोडे दुर जाणेसुद्धा होत नव्हते सहन; मुलीच्या चिंतेमुळे आईचे आंघोळ करणे आणि कॉफी पीणेसुद्धा झाले होते कठीण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:20 PM IST

मुलीला रडताना पाहून आईने शोधला असा उपाय, ऐकून जगभरातील महिला झाल्या तिच्या फॅन्स.

 • Mum comes up with genius trick to keep her baby sleeping soundly while she grabs coffee and a shower

  ऑस्ट्रेलिया- राहणारी एक महिला तिच्या हुशारीमुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. तिची एक महिन्याची मुलगी तिला थोड्यावेळेसाठीसु्द्धा दुर होऊ देत नसल्यामुळे ती सतत चिंतेत असायची. त्या महिलेने बाळाला थोडावेळ जरी बाजूला ठेवले तरी ती जोर-जोरात रडायची. मुलीच्या या रडण्यामुळे महिलेला आंघोळ करणे आणि कॉफी पीणेदेखिल अवघड झाले होते. किरकोळ समस्येवर त्या महिलेने एक सोपा उपाय शोधून काढला. जेव्हा या महिलेने हा उपाय आणि तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा जगभरातून तिचे चांगलेच कौतुक करण्यात होत आहे.

  मुलीची झोपमोड होऊ नये म्हणून शोधला उपाय

  > या महिलेचे नाव मेलिसा डिक्स्ट्रा असून ती ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राहते. मेलिसाची मुलगी तिला थोड्यावेळेसाठी सुद्धा दुर होऊ देत नव्हती. ती झोपल्यानंतरदेखिल मेलिसाला तिच्या जवळ थांबावे लागत होते. यावर मेलिसाने एक उपाय शोधला, हा उपाय पाहून जगभरात या महिलेचे कौतुक होत आहे.
  > मेलिसाने हा उपाय फेसबुक पेज 'बेबी हिंट्स अॅन्ड टिप्स'ला देखील शेअर केला. या पेजवर एक बाळ झोपलेले दिसत आहे आणि त्याच्या पोटावर एक रबरी हॅन्ड ग्लोव्ह्ज (हातमोजे) ठेवलेले आहे. लिक्विडने भरलेले हे हॅन्ड ग्लोव्ह्ज बाळाच्या पोटावर अशा पद्धतिने ठेवलेले आहे जसे एखादी आई तिचे हात बाळाला गोंजारतांना ठेवते.
  > हे बाळ मेलिसाचे असून तिने ते हॅन्ड ग्लोव्ह्ज तिच्या बाळाच्या पोटावर ठेवले होते. तिने हॅन्ड ग्लोव्ह्ज यासाठी ठेवले होते जेणेकरुन बाळाला झोपेत असताना वाटले पाहिजे की मेलिसा तिच्याजवळ आहे. हॅन्ड ग्लोव्ह्जमुळे ती झोपेत असते तेव्हा मेलिसाला इतर कामे करता येतात.
  > मेलिसाने तिच्या मुलिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहले होते, 'आता मी 20 मिनीटांसाठी जात आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला याची भनकसुद्धा नाही. तिला जेव्हा कळेल आणि ती झोपेतून जागी होईल तोपर्यंत माझी कॉफी पिऊन झालेली असेल.'
  > मेलिसाने सांगते, 'असे केल्यामुळे मला आंघोळीसाठी आणि माझी कॉफी संपवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यानंतर मी तिच्याजवळ जाऊन बसते, ती उठल्यानंतर रडतही नाही, पण ती थोडीशी गोंधळलेली दिसते.'

  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोघींचे फोटो

  > मेलिसाने पोस्ट शेअर करताच ती व्हायरल झाली. 4 दिवसांतच मेलिसाच्या पोस्टवर 10 हजारपेक्षा जास्त लोकांनी कॉमेंट्स केल्या. आतापर्यंत ही पोस्ट हजारोवेळाप शेअर करण्यात आली आहे.

 • Mum comes up with genius trick to keep her baby sleeping soundly while she grabs coffee and a shower
 • Mum comes up with genius trick to keep her baby sleeping soundly while she grabs coffee and a shower

Trending