आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई 26/11 हल्ला: अमेरिकेतून भारतात आणला जाऊ शकतो दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - मुंबईत 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक तहव्वुर राणा याला भारतात आणले जाऊ शकते. तो सध्या दहशतवादाच्या आरोपात अमेरिकेतील एका तुरुंगात कैद आहे. वृत्तसंस्तेने जारी केलेल्या माहितीनुसार, त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी भारतात प्रत्यर्पण केले जाऊ शकते. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पावलेल्यांमध्ये अमेरिकन नागरिकांचा सुद्धा समावेश होता. हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार राणाला अमेरिकेने 2009 मध्ये अटक केली. तसेच 2013 मध्ये त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.


प्रत्यर्पणाणासाठी 26/11 हल्ल्याचे आरोप लावता येणार नाही
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतात प्रत्यर्पण करण्यासाठी तहव्वुर राणाच्या विरोधात 26/11 हल्ल्याचे आरोप लावता येणार नाही. कारण, अमेरिकेत एका गुन्ह्यासाठी फक्त एकदाच शिक्षा होऊ शकते. अमेरिकेतील तुरुंगात तो याच आरोपासाठी कैद आहे. अशात भारताने पुन्हा तेच आरोप लावल्यास भारताची विनंती फेटाळली जाईल.
भारताने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी राणाच्या विरोधात इतर आरोप लावले जातील. सुत्रांच्या माहितीनुसार, त्याने दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि चाबड हाऊस येथे हल्ल्याचा कट रचला होता. यासोबतच त्याच्या विरोधात फसवणुकीचे देखील आरोप आहेत. हेच आरोप लावून त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.


अमेरिकेकडून मिळू शकते आव्हान
भारत सरकार सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाची कागदपत्रे गोळा करत आहे. जेणेकरून राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा करता येईल. तरीही अमेरिकेतील प्रशासन आणि नोकरशाही यंत्रणा क्लिष्ट असल्याने संपूर्ण प्रक्रियेत विलंब होण्याची आणि भारताला आव्हान मिळण्याची शक्यता सुद्धा नकारता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...