आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या, समोर आला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरी गमावल्यामुळे ती अस्वस्थ होती, पोलिसांना संशय
  • पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

मुंबई - कांदेवलीच्या चारकोप येथे गुरुवारी एका महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत कथितरित्या आत्महत्या केली. शुक्रवारी या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सदरील महिला नोकरी गमावल्यामुळे अस्वस्थ असल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले आहे. 

चारकोप पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी सांगितले की, डिंपल वाडीलाल (वय 40) या महिलेने गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता रॉक अॅव्हेन्यू बिल्डिंगवरून उडी मारली होती. यानंतर ती गंभीररित्या जखमी झाली. घटनास्थळावरील लोकांनी तिला शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आस्कमिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 
 

आईसोबत फ्लॅटमध्ये राहत होती महिला  


शिंदे यांनी सांगितले की, डिंपल आपल्या आईसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तिला नुकतीच आपली नोकरी सोडवी लागली. नोकरी गमावल्यामुळे ती त्रस्त असल्याचा पोलिसांना संशय आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार महिलेच्या आत्महत्येमुळे तिच्या आईला धक्का बसला आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी केली गेली नाही.