आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai : 70 Years Old Chitra Cinemas Turned Closed, 'student Of The Year 2' Was The Last Film Showed There

मुंबई : 70 वर्षे जुने चित्रा सिनेमागृह झाले बंद, शेवटाच्यावेळी दाखवला गेला चित्रपट 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुंबईचे प्रसिद्ध चित्रा सिनेमागृह अखेर बंद केले गेले. 70 वर्षांपासून सुरु होते हे सिंगल स्क्रीन थियेटर मुंबईच्या दादर येथे होते. 16 मेला टायगर श्रॉफ, अनन्या पांडेय आणि तारा सुतारिया स्टारर 'स्टुडंट ऑफ द ईयर' दाखवली गेली. 

 

1932 मध्ये झाले होते सुरु... 
या थिएयरला 70 वर्षांपूर्वी दोराबजी मेहताने सुरु केले होते. येथे हिंदी, मराठी आणि इंग्रजी चित्रपट दाखवले जायचे. दोराबजी यांच्या मृत्यनंतर त्यांचा मुलगा आणि त्यांच्यानंतर 1982 पासून त्यांचा नातू दारा पिरोज मेहता चित्रा सिनेमागृह चालवत होते. 

 

वेब सीरीजच्या काळामुळे झाले नुकसान... 
एका इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून कमाई होत नसल्यामुळे त्यांना सिनेमागृह बंद करण्याचे पाऊल उचलावे लागले. ऑनलाइन प्लेटफॉर्म आल्यानंतर सतत आम्हाला थिएटर चालवण्यात समस्या येत होत्या. कारण आता लोक घरी बसूनच चांगला कंटेंट पाहत असतात. हेच कारण आहे की, आम्हाला याला बंद करावे लागते आहे. 

 

अनेक चित्रपटांनी येथे साजरी केली गोल्डन जुबली... 
हे थिएटर सिनेमाच्या अनेक चांगल्या क्षणांचा साक्षीदार आहे. सुरुवातीला येथे मोठ्या पांढऱ्या पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे फिल्म दाखवली जात होती. त्यानंतर वेळ बदलली आणि थिएटर वेळेबरोबरच अपग्रेडदेखील झाले. येथे 'उड़न खटोला', 'मदर इंडिया' आणि 'एप्रिल फूल' यांसारख्या चित्रपटांनी गोल्डन जुबली साजरी केली होती. शम्मी कपूरचा चित्रपट 'जंगली' येथे सतत 25 आठवडे चालली होती.