आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना केली अटक; मुंबई एटीएसची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र एटीएस पथकाने ठाण्यातून अवैधरित्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. यात 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 500 बोगस सिमकार्ड, अनेक टेलिफोन उपकरणे, 3 लॅपटॉप, 4 डेस्कटॉप, 11 मोबाइल, एक सर्व्हर, 4 वायफायसह इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. 
 

यामुळे सरकारचे 37 कोटी रुपयांचे नुकसान
हे लोक व्हिओआयपी इंटरनेट कॉलद्वारे लोकल नंबर्सला यूएई आणि आखाती देशांमध्ये वळवण्याचे काम करत होते. यामुळे सरकारला तब्बल 37 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे तपासात समोर आले. भारतात अवैधरित्या कॉल रॅकेट सुरु असल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. या प्रकरणी एटीएसने मुंबईतील वरळी, पनवेल, शिवाजीनगर (गोवंडी), डोंगरी, मशीद बंदर आणि कल्याण येथे छापेमारी करत 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख रुपये किमतीचे सामान जप्त करण्यात आले आहे. 

सदरील कॉल सेंटर मुंबईत होते. येथून देशातील कोणत्याही भागातून फोन करून आखाती देशांमध्ये वळवण्यात येत होता. पकडलेल सर्व आरोपी फोन आणि इंटरनेटच्या व्यवसायाशी निगडीत आहेत. दरम्यान या टोळीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांबाबत एटीएस तपास करत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...