मुंबईवरील २६/11 चा हल्ला २९ सप्टेंबरलाच होणार होता

May 26,2011 09:25:10 PM IST

mumbai_attack_2501_f_250शिकागो - पाकिस्तानात असलेल्या लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर २६ नोव्हेंबरला केलेला हल्ला नियोजनानुसार २९ सप्टेंबरला म्हणजेच हल्ला झाल्याच्या दोन महिने अगोदरच करण्याचा कट रचला होता. मात्र दहशतवादी मुंबईत पोहचण्यास अडचण व उशीर झाल्यामुळे हल्ल्याची तारीख नंतर बदलण्यात आली, असे शिकागोमधील स्थानिक न्यायालयात डेविड हेडली याने सादर केलेल्या कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे.दहशतवाद्यांच्या नाव (बोट) पाकिस्तानातून येताना समुद्रात दगडाला धडकल्याने नष्ट झाली होती. त्यामुळे २९ सप्टेंबरची मोहिम बारगळली होती.

कागदपत्रात नमूद केल्यानुसार, साजिद मीरने हेडलीला सांगितले होते की, हल्ला रमजानच्या २७ तारखेला होईल. जो दिवस २९ सप्टेंबर होता. त्यावेळी साजिदकडून हेडलीला निरोप आला होता की, नियोजन झाले आहे. मात्र त्यानंतर नाव खराब झाली आहे. मात्र दहशतवाद्यांजवळ जीवरक्षक जॅकेट असल्याने त्यांना जिवंत राहण्यात यश आले होते.यानंतर हेडलीने पाकिस्तानी सेनेचे निवृत्त लष्कर अधिकारी अब्दुर रहमान ऊर्फ पाशाची भेट घे्तली होती. यावेळी यावर मत व्यक्त करताना ही हल्ल्यासाठी योग्य वेळ नसल्याचे अल्लाकडून संकेत असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर पुन्हा आक्टोबर २००८ मध्ये हल्ला करणार होते मात्र साजिदने हेडलीला पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे सांगितले होते.मुंबई हल्ल्यात 'आय़एसआय'चा हात, राणाची न्यायालयात कबुलीतालिबानी नेता मुल्ला उमर बेपत्ता, 'आयएसआय़'च्या ताब्यात

X