आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ला : तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाची शक्यता; २०२१ पूर्वी शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी तहव्वूर राणा (५८) याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेच्या शिकागोतील रहिवासी असलेल्या राणाला दहशतवादी हल्ल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी २०२१ पर्यंत त्याला भारताकडे सोपवले जाऊ शकते.   


पाकिस्तानात जन्मलेल्या व कॅनडाचे नागरिकत्व असलेल्या राणाला एका डॅनिश वृत्तपत्राविरोधात हल्ल्याचा कट रचणे व पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाला हल्ल्याचे साहित्य पुरवण्याप्रकरणी फेडरल ज्युरींनी दोषी ठरवले होते. मुंबईत २६/११ रोजी लष्कर-ए-तोयबाच्या दहा पाक दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण १६६ नागरिक ठार झाले होते. त्यातील ६ जण अमेरिकेचे नागरिक होते. या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अजमल कसाबला ताब्यात घेण्यात आले होते व भारतीय न्यायालयाने त्यास फाशीची शिक्षा सुनावली होती.  


याप्रकरणी २०१३ मध्ये राणाला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली. त्यानंतर अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश हॅरी लिनेनवेबर यांनी पाच वर्षे नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा सुनावली होती. राणाला २०२१ मध्ये भारताला सुपूर्द केले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...