आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Based Animator Makes Mosaic Portrait Of Chhatrapati Shivaji Maharaj, Sets World Record

अॅनिमेशन आर्टिस्टने 6 रंगाच्या 46 हजार प्लास्टिकच्या तुकड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्टेट साकारले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नितिन दिनेश कांबळेने 10 दिवसांत 10 फूट लांब आणि 8 फूट रूंद छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढले
  • नितिनने म्हटले की, तरुणांनी आपल्या देशातील महापुरुषांबद्दल जाणून घ्यायला हवे, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी

मुंबई - एका अॅनिमेशन आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे मोजेक पोर्टेट तयार करून जागतिक विक्रम बनवला आहे. नितिन कांबळेच्या मते, त्याने 10 दिवसांत 10 फूट लांब आणि 8 फूट रुंद हे चित्र तयार केले. यासाठी त्याने विविध रंगांचे 46 हजार प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर केला. 
नितिनेने सांगितले की, मी हे पोर्टेट तयार करण्यासाठी 48 हजार 80 प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर केला. भारतात सिंगल प्लास्टिकवर बंदी आहे, परंतु आपण यावर अधिक प्रभावीपणे अंकुश ठेवू शकत नाहीत. कारण ते आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. लोक पर्यावरण संरक्षणासाठी जागरूक रहावे या उद्देशानेच मी हे पोस्टर तयार केले आहे. दरम्यान या पोर्टेटची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियात नोंद झाली असल्याचे नितीनने सांगितले. तो म्हणाला की, हा माझा पहिला जागतिक विक्रम आहे. मला स्वातंत्र्य सेनानींसाठी आणखी काम करायचे आहे. युवा पिढीने यांच्याबाबत जाणून घ्यायला हवे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.