मुंबई / मुंबईच्या झाेपडपट्टीतील जयकुमार अमेरिकेत शास्त्रज्ञ होताच संधिसाधू नातेवाइकांची गर्दी

प्रयोगशाळेत जयकुमार वैद्य प्रयोगशाळेत जयकुमार वैद्य

व्हर्जिनिया विद्यापीठाची १७ लाख रुपये वार्षिक पगारावर संशोधनासाठी नियुक्ती

Sep 03,2019 09:28:00 AM IST

मुंबई - एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ आली तर सगळे त्याची साथ सोडतात, असा जगाचा अनुभव आहे, असे म्हटले जाते. चांगली वेळ आली तर जो तो त्याच्याशी नातेसंबंध जोडू पाहतो, असेही म्हटले जाते. मंुबईच्या जयकुमार वैद्य यास या अनुभवाचा प्रत्यय आला. २५ वर्षांचा हा तरुण अमेरिकेत शास्त्रज्ञ झाला आहे. आपला अनुभव सांगताना तो म्हणाला, माझे बालपण मुंबईच्या झोपडपट्टीत संघर्षातच गेले. वडिलांपासून विभक्त झालेली माझी आई माहेरी राहत होती. तेथेच माझा जन्म झाला. त्या काळात आईकडे उत्पन्नाचे काही साधन नव्हते. मामा व मामीने आजी-आईला आर्थिक मदत नाकारली. २००३ मध्ये आजीची प्रकृती बिघडल्यानंतर व मामाने मारहाण केल्याने मायलेक जवळच्या चाळीतील एका छोट्या खोलीत जाऊन राहिले. फी न भरल्याने जयकुमारला शाळेत परीक्षेलाही बसू दिले गेले नाही. म्हणून त्याने टीव्ही दुरुस्तीचे काम सुरू केले. शिक्षणही सुरूच ठेवले. त्याला पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. रोबोटिक्सशी संबंधित प्रकल्प तो तयार करत होता. त्यात त्याला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यामुळे जयकुमारला एका कंपनीत इंटर्नशिप मिळाली. २०१६ मध्ये तो रिसर्च फेलो झाला. अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाने त्याला नॅनो टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी वार्षिक १७ लाख रुपये पगारावर नियुक्ती दिली. लहानपणी जे नातेवाईक ढुंकूनही पाहात नव्हते ते फोन करतात, असे तो सांगतो.

X
प्रयोगशाळेत जयकुमार वैद्यप्रयोगशाळेत जयकुमार वैद्य