Home | Maharashtra | Mumbai | Mumbai Bridge Collapse eyewitness who narrowly escaped share the account

मुंबईत पूल कोसळला.. 30 फूट उंचीवरून पडली महिला, डोक्यातून भळभळत होते रक्त, सगळ्यांना म्हणाली, 'मला एकटीला अॅम्बुलन्समध्ये नेऊ नका, मी त्याला सोडू शकत नाही'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 02:51 PM IST

सर्वाधिक गर्दीच वेळ असलेल्या वेळी पूल कोसळल्याने मोठा हाहाकार उडाला.

 • Mumbai Bridge Collapse eyewitness who narrowly escaped share the account

  मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजता पादचारी पूलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर 34 जण गंभीर जखमी झाले. सर्वाधिक गर्दीच वेळ असलेल्या वेळी पूल कोसळल्याने मोठा हाहाकार उडाला.

  सीएसटीएमकडून कामा हॉस्पिटलच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा हा पादचारी पूल आहे. पुलाखाली दोन गाड्या दबल्या गेल्या आहेत. संध्याकाळी ऑफिसेस सुटल्यानंतर या पुलावर मोठी गर्दी झाली होती. चाकरमाने सीएसटी स्टेशनकडे जाण्यासाठी याचा पुलाचा वापर करतात. पुलाच्या शेजारी टाईम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे. तसेच महत्त्वाची ऑफिसेस या भागात आहे. या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या लोकांनी आपला पुर्नजन्म झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

  एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पुलाचा स्लॅब कोसळला तेव्हा पुलावर आणि पुलाच्या खाली रस्त्यावर प्रचंड वर्दळ होती. 'ती' घटना अत्यंत भयावह होती. ती अजूनही डोळ्यासमोरून जात नाही आहे.

  'मुंबई मिरर'च्या रिपोर्टनुसार, 30 फूट उंचीवरून हर्षदा वाघमारे (40) या खाली पडल्या. त्यांच्या डोक्यातून रक्त भळभळत होते. प्लीज माझे पर्स शोधून द्या. ते घेतल्या‍शिवाय मी जाऊ शकत नाही, असे हर्षदा वाघमारे मदतकार्य करणार्‍या लोकांना त्या वारंवार सांगत होत्या. अखेर हर्षद यांचे पर्स सापडले नाही.

  5 वर्षीय मुलीची आई असलेल्या हर्षदा या कालबादेवी गार्मेंट बाजारातील एका फर्ममध्ये फोन ऑपरेटर पदावर नोकरी करतात. ऑफिस सुटल्यानंतर हर्षदा या दुर्घटनाग्रस्त पुलावरून सीएसटीकडे निघाल्या होत्या. तितक्यात पुलाचा स्लॅब कोसळला आणि हर्षदा खाली पडल्या. हर्षदा यांना स्वत:च्या जीवापेक्षा पर्सची जास्त चिंता होती. कारण त्यात पैसे, मोबाइल फोन आणि आधार कार्ड होते. परंतु त्यांना पर्स सापडलेच नाही. हर्षदा यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Trending