आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 1.30 वाजता बसमधून उतरली तरुणी, ड्रायव्हर-कंडक्टरने विचारले कोणी घ्यायला येत आहे का? ती नाही म्हणाली, आणि..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभरात महिला, तरुणी आणि चिमुरड्या मुलींवर छेडछाड, बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मात्र मुंबईत बेस्ट बसचे एक ड्रायव्हर आणि कंडक्टरने असे काम केले आहे की, त्याचे सगळेच कौतुक करत आहेत. त्यांच्या कामाबाबत समजल्यानंतर तुम्हीही त्यांला सॅल्युट कराल. 


काय आहे प्रकरण.. 
- मुंबईत काही दिवसांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे महिलांना याची जाणीव करून दिली की, मुंबई त्यांच्यासाठी अगदी सुरक्षित आहे. 
- मुंबईत एका कंपनीत काम करणार्या मुलीला एका बेस्ट बसने रात्री 1.30 वाजता गोरेगावच्या रॉयल पाम बस स्टॉपवर सोडले. तरुणी उतरली ती जागा अगदी सामसूम होती आणि ती तरुणी अगदी एकटी होती. 
- तिची परिस्थिती पाहता बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने तरुणीला सोबत राहण्यासाठी बस तिथेच उभी केली. काहीवेळाने अॅटो आला तेव्हा दोघांनी तरुणीला रिक्षात बसवले आणि मग ते पुढे गेले. 


ट्वीटमध्ये केले कौतुक.. 
- विशेष म्हणजे ड्रायव्हर कंडक्टर तरुणीला सोडून जाऊ शकत होता. कारण तो त्याच्या ड्युटीचा भाग नव्हता. पण माणुसकी म्हणून त्याने तरुणीला सामसूम ठिकाणी एकटीला सोडणे योग्य समजले नाही. 
- या घटनेनंतर @nautankipanti ट्वीटर हैंडलवरून तरुणीने बेस्ट बस 398 चा ड्रायव्हर आणि कंडक्टरचे कौतुक केले. तिने लिहिले.. - रात्री 1.30 वाजता मी सामसूम रस्त्यावर एकटी होते. त्यांनी मला विचारले कोणी घ्यायला येणार आहे का, मी नाही म्हटले तर त्यांनी रिक्षा येईपर्यंत बस थांबवून ठेवली. त्यानंतर मला बसवून ते पुढे गेले. यामुळेच मला मुंबईवर विशेष प्रेम आहे. 

This is the reason i love #Mumbai

I would like to thanks #Best Bus driver of 398 ltd. Who dropped me at 1.30 am at a deserted bus stop and asked me if someone is there to pick me up. To which i replied no. He made the entire bus wait until i got the auto. @WeAreMumbai

— Sleeping Panda #Followback (@nautankipanti) October 5, 2018

बातम्या आणखी आहेत...