आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात व्यापाऱ्याचा मृतदेह, घटनास्थळी रिव्हॉल्वरही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिझनेस हब मानल्या जाणाऱ्या मुंबईतील लोअर परेळ भागात एका कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा मृतदेश मुंबईतील व्यापारी अश्विन जैन यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना कारमध्ये एक रिव्हॉल्वरही आढळून आली आहे. अश्विन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. अश्विन यांच्यावर कोटींचे कर्ज असल्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते.


अश्विन जैन घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लालबाग भागातील घटाव बिल्डिंगमध्ये राहत होते. घरामध्ये कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून ते दुपारी 2 वाजता घराबाहेर पडले होते. पोलीस अश्विन यांच्या आत्महत्येच्या मुख्य कारणांचा तपास घेत आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की, अश्विन रात्री 10 पर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध सुरु केला. या दरम्यान अश्विन यांनी आपल्या काही मित्र आणि नातेवाईकांना मॅसेज केला की, 'माय लाईफ इज बोर, मैं यह दुनिया छोड़ कर जा रहा हूं' अश्विन यांच्या या मॅसेजमुळे कुटुंबातील लोक जास्तच घाबरून गेले.


कुटुंबीयांनी ही माहिती लगेच स्थानिक पोलीस स्टेशन काळाचौकी येथे दिली. पोलिसांनी लगेच अश्विनचा शोध सुरु केला. मोबाइल सर्व्हिसमुळे पोलिसांना अश्विनचे लोकेशन शुक्रवारी दुपारी 1 वाजता लालबागच्या डॉ. एसएस राव रोड स्थित फिन्ले बिल्डिंगजवळ मिळाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बिल्डिंगच्या बाहेर अश्विन यांची कार पार्क होती आणि कारमध्ये अश्विन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. अश्विन यांनी आपल्या वडिलांच्या लायसन असलेल्या रोव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.


पोलीस तपासामध्ये अश्विन गोल्ड कमिशन एजंटचे काम करत असल्याचे समोर आले आहे. अश्विनने व्यापाऱ्यांकडून सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यांचे पैसे द्यायचे होते आणि यामुळे मागील काही दिवसांपासून तणावात होते.

बातम्या आणखी आहेत...