आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे भारतातील सर्वात मोठा चोर बाजार; मोबाइलपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वच मिळते फुकट भावात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जगभरात तुम्ही अनेक चोर बाजारांबद्दल ऐकले असेल जिथे चोरीचे सामान मिळते. या चोर बाजारांत कपड्यांपासून गाड्यांपर्यंत सर्वच वस्तू मिळतात. परंतु आज आम्ही तुम्हाला देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील चोर बाजारविषयी सांगणार आहोत. जिथे तुम्हाला तुमच्याच घरातून चोरी झालेल्या वस्तू पाहायला मिळाल्या तर नवल वाटायला नको. तुम्हीही याठिकाणी कधी शॉपिंग करायला आलात तर तिथे तुमची कार किंवा बाईक व्यवस्थित पार्क करा किंवा एकाने कारजवळच थांबा. नाही तर इथे तुमच्याच गाडीचे पार्ट्स तुम्हालाच विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

मुंबईचा चोर बाजार

हा बाजार दक्षिण मुंबईत मटन स्ट्रीट मोहम्मद अली मार्गावर आहे. हा बाजार सुमारे 150 वर्षे जुना आहे. 'शोर बाजार' म्हणून हा बाजार प्रसिद्ध होता. कारण दुकानदार मोठ्या आवाजात आपल्या वस्तूची किंमत लावत होते. यामुळे बाजारात नेहमी गलबला असायचा. मात्र, ब्रिटिशांच्या काळात 'शोर' हा शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारल्याने या बाजाराचे नाव चोर बाजार असे पडले. येथे जुने कपडे, ऑटोमोबाइल पार्ट्स, या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जगातील सर्व प्रकारच्या वस्तू अगदी कमी दरात मिळतात.

 

इथे मिळतात सर्व प्रकारच्या वस्तू

या बाजारात जुने कपडे, ऑटोमोबाइलचे पार्टस्, चोरीच्या घड्याळी, चोरीच्या विंटेज व अँटीक वस्तू, मुघलकालिन वस्तू अशा आदीप्रकारच्या वस्तू स्वस्त दरात मिळतात. तेव्हा तुम्ही कधी मुंबईला गेलात तर हा चोर बाजार नक्की पाहा. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...