आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिलों से, तर्कों के साथ लडेंगे, स्टुडंट्स से जो टकराओगे बडा पछताओगे, बडा पछताओगे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई कलेक्टिव्हमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जागृती करताना तरुणींचे एक पथक. - Divya Marathi
मुंबई कलेक्टिव्हमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जागृती करताना तरुणींचे एक पथक.

रूपेश कलंत्री

मुंबई 

गलती मेरी नही थी, कहाँ गयी थी, क्या पहेना था..( २)
बलात्कारी थे तुम.. बलात्कारी थे तुम..
बलात्कारी थे तुम ..
..

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आवारात दुपारची शांतता भेदणारा युवतींचा पथनाट्यातील आवाज.. सोबतीला डफ-ढोल, लयबद्ध हालचाली आणि शब्दांबरोबरच जणू प्रत्येकीच्या डोळ्यातून निघणारे वाक्य, ‘बलात्कारी थे तुम’.  सादरकर्त्यांमध्ये बहुतांश मुली, तृतीयपंथी, दोनच महिला आणि त्यात लक्ष वेधून घेणारी एक अभिनेत्री सुषमा देशपांडे.  त्यानंतर सभागृहाच्या आत एक तरुण गायक आणि यूट्यूबर पूजन साहिल सत्ताधाऱ्यांशी पंगा घेतो. शिस्तीत, शांततेत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या ‘इंटलेक्ट’ पद्धतीला शिट्ट्यांच्या आवाजाने भेदण्याचे आवाहन करतो. ‘मासेस’पर्यंत पोहोचण्यासाठी फिल्मी गाण्यांच्या चालींचा आधार उपयुक्त ठरेल, हे सांगतो आणि अरिजित सिंगच्या ‘बडा पछताओगे’ गाण्याआधारे बदलाचे फायदे सिद्ध करतो. 


सीधे मुँह वो सीधी बात करते नही,
वो डरते है के, हमसे वो डरते नही 
जाहिलों से, तर्कों के साथ लडेंगे
स्टुडंट्स है हम तो, सवाल करेंगे 
जवाब देने से जो कतराओगे, 
डा पछताओगे  पुढेही चपखल शब्द, गाण्यावर पकड, सभागृहातील सर्वांचा सहभाग आणि वन्स मोअरला वन मोअरने प्रतिसाद सुरू राहतो. हा प्रतिसाद फक्त गिटारवरील गाण्यांनाच नाही, तर नीला भागवत यांच्या शास्त्रीय संगीतालाही मिळतो. एन. राम यांच्या संयत-माहितीपूर्ण, मिहीर देसाईंच्या रोखठोक, तर स्वरा भास्करच्या आक्षेपार्ह शब्दांसह तडाखेबाज मतांनाही दाद मिळते. अभिनेता सुशांत सिंग, ‘सर्व देशद्रोहींना नमस्कार!’ करून सुरुवात करतो, तर त्यालाही टाळ्यांनी प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, या प्रतिसाद देणाऱ्यांत लक्ष वेधून घेतात १८ ते २५ वयोगटातील युवक आणि खासकरून मुली. औरंगाबाद, पुणे, आयआयटी पवई, टीस मुंबईची ही मुले. माॅडर्न-अल्ट्रा माॅडर्न वेशभूषा, केशरचना आणि त्याला साजेशी इंग्रजी. काही वेळा कानावर पडणारी हिंदी, मराठी आणि विशेषकरून दक्षिणेतील भाषा. लाल झेंड्याखाली उन्हातान्हात घोषणा देत आंदोलन करणाऱ्या कष्टकऱ्यांपेक्षा हा क्लास आणि वातावरण वेगळेच. म्हणूनच बदलाचे वारेही वाहत होते. ज्या आरएसएसला टोकाचा विरोध करायचा तशीच रचना, तसेच जाळे तयार करण्याची सूचना संघातून बाहेर पडून पुरोगामी चळवळीत सक्रिय झालेले भंवर मेघवंशीही करतात. 
सीएए, एनआरसीची किनार असल्याने सर्व डाव्या संघटना एका ठिकाणी जमल्या होत्या. मात्र, सर्व चित्र ‘गुडी-गुडी’ नव्हते. पुरोगामी, अतिपुरोगामी आणि डाव्यांमधील मतभेदही गटागटाने चर्चा करताना दिसत होते.  तीच गोष्ट हेरून अभिनेत्री नंदिता दासने कोण किती पुरोगामी असल्याची स्पर्धा करु नका व बदल करून एकत्र या आणि रस्त्यावरील आंदोलनाबरोबर समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा सल्ला दिला. एकूणच विशिष्ट विचारांची, विचार पोहोचवण्यासाठीची परिषद काही बदलांसाठी आग्रही दिसते. त्यामुळे हा बदल,  येत्या काळात मुंबईबाहेर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेचा आधार घेत त्याचा विरोध करताना दिसला, तर नवल वाटायला नको.गांधींनाही सोबत घ्या :


प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद पटवर्धन, डावा विचार आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडण्यासाठी ‘जय भीम काॅम्रेड’ची गरज सांगतात. चळवळीत गांधींनाही सोबत घेण्याचा बदल सुचवतात. सभागृहातील आपण सगळे नास्तिक आहोत, हे एक गायक दोनदा बोलतो, तर थोड्याच वेळात दुसरा दुरुस्ती सुचवून ‘सगळेच नास्तिक नाहीत’, असेही स्पष्ट करतो.