आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सी चालकाने 'त्या' परिसरात जाण्यास दिला नकार, वासनांध पोलिसाने केला रेप

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील सीएसटी रेल्वे स्टेशनजवळ अनैसर्गिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. यामध्ये एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी ड्रायव्हर रात्रीच्या वेळी बेंचवर झोपला होता. या प्रकरणी अमित धनकड नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

वेश्यालयात नेण्यास सांगितले, टॅक्सी ड्रायव्हरने दिला नकार

याबाबत सविस्तर वृत्त असे की आरपीएफ कर्मचारी अमित धनकड सीएसटी स्टेशनजवळ फिरत होता. त्याने याच ठिकाणी एका बेंचवर झोपलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला ग्रँट रोड येथील वेश्या वस्तीत सोडण्यास सांगितले. परंतु, टॅक्सी चालकाने त्या ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार दिला. या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि वासनांध रेल्वे पोलिसाने पीडित टॅक्सी ड्रायव्हरला बळजबरी पकडून कोपऱ्यात नेले. तसेच त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की या घटनेनंतर आरोपी आरपीएफ पोलिसाने टॅक्सी ड्रायव्हरला धमकावले. आणि त्याच्याकडील पैसे, मोबाईल आणि टॅक्सीच्या चाव्या घेऊन पसार झाला. यानंतर कसे-बसे पीडित ड्रायव्हरने एमआरए मार्ग पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली. या घटनेनंतर आरपीएफने आरोपी धनकडला तात्काळ निलंबित केले. तसेच त्याच्याविरुद्ध सविस्तर चौकशी सुरू आहे.