आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील सत्र न्यायालयाने पाकिस्तानी लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लश्कर ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याने अमेरिकेतील न्यायालयात पाकिस्तानी संरक्षण दलातील मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इकबाल यांची नावे घेतली आहे. त्यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचला होता असे त्याने सांगितले. त्यानंतरच मुंबई सत्र न्यायालयाने दोघांच्या विरोधात वॉरंट जारी केला आहे.

 

ISI मध्ये तैनात आहे मेजर इकबाल
कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, मेजर पाशा पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाला आहे. तर मेजर इकबाल सध्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मेजर पाशा आणि मेजर इकबाल यांचा आपल्या चार्जशीटमध्ये वॉन्टेड असा उल्लेख केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एसव्ही यारलगाद्दा यांनी 21 जानेवारी रोजी आलेले अपील सुनावणीसाठी स्वीकारले होते. कोर्ट सध्या लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सय्यद झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल प्रकरणाची सुनावणी करत आहे. जुंदालची या हल्ल्यात सक्रीय भूमिका होती असा आरोप आहे.

 

अमेरिकन तुरुंगाद कैद आहे हेडली
डेव्हिड कोलमेन हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. 26/11 हल्ला प्रकरणी तो सरकारी साक्षीदार बनला आहे. 2016 मध्ये त्याची साक्ष व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून नोंदवण्यात आली होती. हेडलीने कोर्टात सांगितले होते, की पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून हा हल्ला केला होता. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही सांगितले होते, की मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात होता, तेव्हा पाकच्या या दोन्ही अधिकाऱ्यांसह लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर, अबु काहफा आणि झकी-उर्रहमान लखवी यांचाही समावेश होता. भारताकडे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे देखील आहेत असे ते म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...