आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझ्या शरीरात अपवित्र आत्मा आहे, पवित्र पुजारीच बाहेर काढू शकतो म्हणत ढोंगीचा गायिकेवर बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समृद्धी आणि करिअरमध्ये भरारी देण्याच्या बहाण्याने घुसला होता घरात
  • मुंबईतील पॉश परिसरातील धक्कादायक घटना, ढोंगी बाबा अटकेत

मुंबई - येथील एका पॉश कॉलनीत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक करण्यात आली आहे. समृद्धी आणि करिअरमध्ये भरारी आणून देण्याच्या बहाण्याने पूजा करतो म्हणत आरोपीने घरात प्रवेश केला होता. यानंतर तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे. ती आत्मा केवळ माझ्यासारखा पवित्र पुजारीच बाहेर काढू शकतो असे म्हणत तरुण गायिकेला भूलथापा दिल्या. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळाले आणि तिने हे संपूर्ण प्रकरण आपल्या पतीला सांगितले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कपलने पोलिसांत तक्रार दिली. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव उमेश रमाशंकर पांडे असे आहे. तो ज्या कॉलनीत राहत होता, त्याच ठिकाणी पीडित महिला आपल्या पतीसोबत राहायची. पीडित महिला आणि तिच्या पतीला ढोंगा बाबा उमेश वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने गृहप्रवेश पूजेचा प्रस्ताव मांडला आणि कपलने त्यास तयारी दर्शवली. दोघेही करिअरमध्ये स्थिर नसल्याचे आरोपीच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने घरात एक हवन करावी लागेल असे सांगितले. रविवारची मीटिंग ठरली. यानंतर आरोपीने पतीला पूजा सामुग्री आणण्यासाठी बाहेर पाठवले आणि त्याच्या पत्नीला तुझ्या शरीरात वाइट आत्मा असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने सर्वच सीमा ओलांडल्या. तेव्हा आपल्यासोबत चुकीचे घडल्याचे पीडितेच्या लक्षात आले. महिला इतकी घाबरली होती की तिने दुसऱ्या दिवशी हा प्रकार आपल्या पतीला सांगितला.

बातम्या आणखी आहेत...