आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड, दुबईपेक्षाही मुंबई आणि दिल्लीचा विमान प्रवास महाग!, जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याचा औरंगाबादला फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याचा जोरदार फटका औरंगाबादच्या प्रवाशांना बसत असून मुंबई, दिल्लीचे एअर इंडियाचे तिकीट कमालीचे महागले आहे. मंुबईचे तिकीट तर १९ हजारांच्या घरात पोहोचले अाहे. विशेष म्हणजे मुंबई, दिल्लीच्या तुलनेत थायलंड आणि दुबईचा हवाई प्रवास स्वस्त ठरत आहे.


जेट एअरवेजने १७ एप्रिल २०१९ रोजी देशभरातील सेवा बंद केली. त्याच्या महिनाभर आधीपासूनच औरंगाबादकर जेटचे संकट अनुभवत होते. जेटचे एक विमान संध्याकाळी ५.१५ वाजता मुंबईहून यायचे, तर संध्याकाळी ५.४५ वाजता परत मुंबईला जात होते. ते २१ मार्चपासून बंद झाले. दुसरे विमान सकाळी ६.२० वाजता मुंबईहून यायचे, तर ६.५० वाजता परत मुंबईला उड्डाण करत होते. ते २३ मार्चपासून बंद झाले.  कंपनीच बंद पडल्याने दोन्ही विमाने कायमची बंद झाली आहेत.


तिकिटात तीनपट वाढ : जेट बंद झाल्यामुळे औरंगाबादेतून मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला जाण्यासाठी एअर इंडियाची २ आणि ट्रूजेटचे १ अशी अवघे ३ विमान उरली आहेत. विमाने कमी आणि मागणी जास्त असल्याने तिकिटे तीनपट महागली आहेत. औरंगाबादहून मोठ्या प्रमाणात पर्यटक थायलंड आणि दुबईला जातात. हे लोक पुणे, हैदराबाद किंवा मुंबईहून पुढील प्रवास करतात. मुंबई, दिल्लीपेक्षा थायलंड, दुबईचे तिकीट स्वस्त आहे.
दोन दिवस आधी बुक करूनही मुंबईचे १५,८२७, तर दिल्लीचे तिकीट १९,९८० रुपयापर्यंत पोहोचले होते. पुढील प्रवासाचे तिकीट आधीच खरेदी केले तर त्यात चांगली सूट मिळते. परंतु एअर इंडियाच्या वेबसाइटवर स्पेशल इकॉनॉमी श्रेणीत ३० मे ते ८ जूनपर्यंत मुंबईचे तिकीट ७,४०० ते ८,४०० दरम्यान उपलब्ध आहे. दिल्लीसाठी या श्रेणीतील तिकीट ८,४०० ते ९,७०० दरम्यान उपलब्ध आहे.

 

९ वरून उरली ३ विमाने
> २००८ पूर्वी औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी ५ विमाने. 
>  २०११ मध्ये दिल्लीसाठी एअर इंडिया, जेट एअरवेज आणि स्पाइसजेटने प्रत्येकी १, तर किंगफिशरने हैदराबाद आणि स्पाइस जेटने त्रिवेंद्रमपर्यंत सेवा सुरू केल्याने विमानांची संख्या ९ वर गेली होती. 
>  २१ मार्चपर्यंत शहरातून दिल्ली, मुंबई,हैदराबादसाठी  ५ विमाने सुरू होती. आता त्यात जेटची २ बंद झाल्याने केवळ ३ उरली आहेत.
 

परदेशवारी स्वस्त :

 पुणे, मुंबईहून थायलंड किंवा दुबईचे तिकीट ८ दिवस आधी बुक केले तर १५ ते १८ हजार रुपयांत मिळते, अशी माहिती अल्फा इंडिया टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक अब्दुल अझीझ यांनी दिली. थायलंड, दुबईचे ५ दिवस, ४ रात्रीचे टूर पॅकेज ४० हजारांपासून सुरू होतात. 

 

औरंगाबाद सेंट्रल हब
जेट बंद पडल्याचा औरंगाबादला मोठा फटका बसतोय. शिर्डी येथून विमानांची संख्या वाढत असताना औरंगाबादची घटली अाहे. औरंगाबाद हे विमान वाहतुकीसाठी सेंट्रल हब आहे. नवीन विमाने सुरू व्हावीत. -सारंग टाकळकर, संचालक, अभिश्री ट्रॅव्हल्स

 

जेटचे स्लॉट्स खुले करावेत
एकच कंपनीअसल्याने तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत.  त्या दरात प्रवाशांना तिकीट घ्यावे लागते. जेट बंद होऊनही त्यांनी सकाळचे स्लॉट सोडलेले नाहीत. ते खुले झाले तर ‘लो कॉस्ट’ एअरलाइन्सला येथे संधी मिळू शकेल. 
-अब्दुल अझीझ, अल्फा इंडिया टूर्स

बातम्या आणखी आहेत...