आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेखांचे बादशाह नीळकंठ खाडिलकर यांचे निधन, लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये अग्रलेखांचे बादशाह अशी बिरुदावली असणारे दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक तथा लेखक नीलकंठ यशवंत खाडिलकर यांचे आज 22 नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.  

नीळकंठ खाडिलकर 96 वर्षे जुने नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक होते.  दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्टेशनसमोर त्यांचा अंत्यसंस्कार विधी केला जाणार आहे.  नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी 12 ते 2 दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. खाडिलकर यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनीसह तीन मुली आहेत. त्यांच्या तिन्ही मुली भारताच्या लेजेंडरी चेस चॅम्पियन आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खाडिलकर यांना श्रद्धांजली वाहिली. खाडिलकर यांनी पत्रकारितेत मोठे आणि उल्लेखनीय योगदान दिल्याचे ते म्हणाले.