Home | Maharashtra | Mumbai | Mumbai Footover Bridge Collapsed Near CST 6 Dead

मुंबईतील दुर्घटना : ‘कसाब’ पूल कोसळून 6 ठार, 33 जखमी, मृतांत 3 महिला; रेड सिग्नलमुळेे वाचले लोक

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 15, 2019, 08:40 AM IST

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेतील 23 मृत्यूंनंतर झाले होते ऑडिट

 • Mumbai Footover Bridge Collapsed Near CST 6 Dead

  मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटीजवळील एका पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला. ३३ जण जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी ७.२० वाजता ही दुर्घटना घडली. १९८० मध्ये बांधलेल्या या पुलाचा एक भाग कोसळला तेव्हा त्यावर सुमारे १०० लोक होते. हा पूल रेल्वेने बांधला. देखभालीचे काम महापालिकेकडे होते. पुलाचे ऑडिट झाले तेव्हा सल्लागार कंपनीने पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवली होती. त्याच्या निविदा स्थायीमध्ये येणार होत्या, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.


  एलफिन्स्टन पूल दुर्घटनेतील 23 मृत्यूंनंतर झाले होते ऑडिट : सप्टेंबर २०१७ मध्ये एलफिन्स्टन पूल चेंगराचंेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील सर्वच पादचारी पुलांचे ऑडिट झाले होते.


  रेड सिग्नलमुळेे वाचले लोक : पुलाखालील रस्त्यावर काही अंतरावरील सिग्नलमुळे अनेक गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.


  सायंकाळी ७.३५ वाजता...
  - चाकरमान्यांची घरी परतण्याची ही गर्दीची वेळ. बरोबर ७.३५ वाजता अचानक या पुलावरील सुमारे ६० टक्के भाग कोसळला आणि ६ जणांना प्राण गमवावे लागले.
  - या दुर्घटनेत जखमी ३३ जणांपैकी सेंट जाॅर्ज रुग्णालयात १५, तर जीटी रुग्णालयात उर्वरित जखमींना दाखल करण्यात आले आहे. काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.


  मूळ हिमालय पूल... मूळ हिमालय ब्रिज असे या पादचारी पुलाचे जुने नाव आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी सीएसटीवरून पळून जाताना हल्लेखोर अतिरेकी कसाब याच पुलावरून पळून गेला म्हणून तो आता ‘कसाब ब्रिज’ म्हणून ओळखला जातो.


  दीड वर्षात तिसरी दुर्घटना
  - ३ जुलै २०१८| अंधेरीत फुटओवर ब्रिज कोसळला होता. १ ठार, तर ६ जखमी.
  - २९ सप्टेंबर २०१७ | एलफिन्स्टन स्टेशनवर पूल कोसळल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी. २३ ठार.
  - मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल.
  - दुर्घटनेतील मृतांची नावे
  अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, भक्ती शिंदे, जाहिद शिराज खान, तपेंद्र सिंह, माेहन कायगुंडे


  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : पुलाच्या ऑडिटमध्ये काही घोटाळा आढळल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 • Mumbai Footover Bridge Collapsed Near CST 6 Dead
 • Mumbai Footover Bridge Collapsed Near CST 6 Dead

Trending