आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराला व्हिडिओ कॉल करून मुंबईच्या तरुणीने जयपूरमधील हॉटेलमध्ये लावून घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जयपूर शहरातील जालूपुरा परिसरातील संसार चंद्र मार्गावरील हॉटेल कुबेर पॅलेसमध्ये मुंबईतील एका तरुणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. गेल्या चार दिवसांपासून तीन हॉटेलमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिने प्रियकराला व्हिडिओ कॉल करून गळफास लावून जीवनप्रवास संपविला. माहिती मिळताच घटनास्थळी जालूपुरा पोलिस पोहोचले. मिराज खातून (28) असे मृत तरुणीचे नाव आहे.

 

गळफास लावण्यापूर्वी विदेशातील प्रियकराला केला व्हिडिओ कॉल

मिराज खातून हिने आत्महत्या करण्यापूर्वी विदेशात राहत असलेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल केला होता. मिळालेली माहिती अशी की, मिराज मागील दोन वर्षांपासून रणधीर विश्वकर्मा नामक तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिला तीन वर्षीय मुलगा देखील आहे. मुलाला तिने दिल्लीतील एका होस्टेलमध्ये ठेवले आहे. काही महिन्यांपूवी मिराज आणि रणधीरचे ब्रेकअप झाले होते. नंतर मिराज विदेशातील एका तरुणाच्या संपर्कात होती. 22 मार्चला ती हॉटेल कुबेरमध्ये आली होती. सोमवारी दुपारी तिने रुमचा दरवाजा उघडला नाही. हॉटेल मॅनेजरला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस आल्यानंतर रुमचा दरवाजा तोडण्यात आला असता गळफास लावलेल्या अवस्थेत मिराज दिसून आली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले.