Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mumbai goa highway accident increased

मुंबई-गोवा मार्गावर अपघातात वाढ

Agency | Update - May 20, 2011, 05:18 PM IST

मुंबई- गोवा मार्गावर या महिन्यात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

  • mumbai goa highway accident increased

    रत्नागिरी - मुंबई- गोवा मार्गावर या महिन्यात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

    मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही जड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्वांना सुट्ट्या असून, मार्गावर लहान वाहनांची गर्दी असते. त्यामुळे कंटेनर, ट्रेलर्स यांची वाहतूक मे महिन्यात थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांचे सर्रास उल्लंघन होत असून गेल्या आठवड्यात मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जणांना जीव गमावावा लागला आहे.

    नुकताच चिपळूण जवळील भोस्ते घाटात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या धडकेमुळे मोटरसायकलवरील दांम्पत्याचा मृत्यू झाला. असे अपघात दररोज होत असून, नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.Trending