Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mumbai goa highway work

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण टप्प्याटप्प्याने! - छगन भुजबळ

divya marathi team | Update - May 28, 2011, 05:37 PM IST

मुंबई ते गोवा या मार्गावरील झाराप ते पत्रादेवी रस्त्याचे चौपदरीकरण डिसेंबपर्यंत होईल, तसेच येत्या दीड वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे टप्प्या-टप्प्याने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून चौपदरीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार होईल, असे ते म्हणाले

  • mumbai goa highway work

    सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटन पायाभूत सुविधा प्राधान्याने निर्माण केल्या जातील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. येत्या दीड वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते चौपदरीकरणासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले.

    सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आरोंदा येथे हाऊसबोटमधून सफर केली. त्यानंतर शिरोडा-वेळागर येथील वादग्रस्त सव्‍‌र्हे नं. ३९, मोचेमाड, नवाबाग वेंगुर्ले या ठिकाणी भेटी दिल्या.

    मुंबई ते गोवा या मार्गावरील झाराप ते पत्रादेवी रस्त्याचे चौपदरीकरण डिसेंबपर्यंत होईल, तसेच येत्या दीड वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे टप्प्या-टप्प्याने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून चौपदरीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार होईल, असे ते म्हणाले.

Trending