आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटलांसह तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेतील माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर दोन मंत्र्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिला दिला. या तिघांच्या मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अॅड. सतिश तळेवर यांनी ही याचिका दाखल केली होती. तसेच पक्ष सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या नेत्यांचा विरोध केला होता. त्यांची मंत्रिपदावर झालेली निवड अवैध असल्याचा दावा तळेकर यांनी केला होता.

विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर या तिघांविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. तळेकर यांनी तिघांच्या मंत्रिपदी निवड होण्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते, या तिघांनी पक्ष बदल कायद्याचे उल्लंघन केले आहे. यानुसार, त्यांची मंत्री पदावर निवड चुकीची आहे. पक्ष बदलल्याने ते विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिलेले नाहीत. अशात त्यांची निवड मंत्री पदावर करणे घटनेचे उल्लंघन आहे असे तळेकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

पक्ष सोडताच थेट मंत्रिपदावर..!
उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केला. त्यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना रोजगार हमी आणि वनस्पत्योत्पादन मंत्रालय देण्यात आले. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) सोडणाऱ्या अविनाश महातेकर यांना देखील मंत्री करण्यात आले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...