आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai Rains / कल्याण-मुरबाड रस्त्यावरील उल्हासनदीवरील पुलाजवळचा रस्ता खचला, वाहतूक तात्पुरती बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कल्याण-मुरबाड रस्त्यावरील उल्हासनदीवरील पुलाजवळचा रस्ता एका बाजूने खचला आहे. मुसळधार पाऊस आणि नदीच्या प्रवाहामुळे या रस्त्याच्या एका बाजूचा माती भराव वाहून गेल्याने ही घटना घडली. स्थानिकांनी रविवारी सकाळी ही दृश्ये दिसताच त्यांनी प्रशासनाची मदत घेतली. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत हालचाली सुरू केल्या. तसेच आजच दुपारनंतर पुन्हा माती भराव टाकण्याचे काम सुरू केले जाणार असे आश्वस्त केले. सध्या रस्त्याचे बांधकाम होत नाही, तोपर्यंत यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोबतच, प्रवास करताना लोकांनी काळजी घ्यावी अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

 

या परिसरात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. अशात पाण्याचा प्रवाह इतका वाढला की आसपासची झाडे सुद्धा वाहून गेली. त्याच प्रवाहाने या पुलाजवळच्या रस्त्याची ही अवस्था केली. रस्त्याच्या एका बाजूखालची माती पूर्णपणे वाहून गेली. सोबतच, एक मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यातून पाण्याच्या प्रवाहाच्या ताकदीचा अंदाज लावता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...