आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील आरे कॉलनीत मेट्रो कार शेडसाठी सुमारे २६०० वृक्ष तोडण्याच्या निर्णयास विरोध करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी चांगलाच दणका दिला. गोरेगावस्थित आरे कॉलनीला वन क्षेत्र घोषित करण्यास हायकोर्टाने नकार दिला. तसेच वृक्षतोडीचा मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय स्थगित करण्यासही नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारतीय डोंगरे यांच्या पीठाने यासंबंधी पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेल्या चार याचिका फेटाळून लावल्या. 

दरम्यान, या याचिका फेटाळल्या जाताच पालिकेने पोलिस फौजफाट्यासह वृक्षतोड सुरू केली. ही माहिती मिळताच पर्यावरणवाद्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी दोन वेळा सौम्य लाठीमार केला. एका तासात पालिकेने ३०० वृक्ष तोडले. सध्या या भागात तणाव आहे. 

बातम्या आणखी आहेत...