आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करून आवाज कसा बुलंद करायचा हे आपल्याला युवा पिढी शिकवत आहे, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने बुधवारी केली. एका एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि आर. आय. चांगला यांच्या न्यायपीठाने जेएनयू हिंसाचाराविरुद्ध मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा उल्लेख केला. दादरमधील शिवाजी पार्कला मनोरंजन पार्क नव्हे, तर क्रीडांगण म्हणून घोषित केले जावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दीपिकाच्या जेएनयू भेटीचे राजकारण, चित्रपटावर बहिष्काराची धमकी
अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूत विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर देशात राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप, विहिंपसह अनेक संघटनांनी दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटावर बहिष्काराची धमकी दिली आहे.
विहिंपचे मिलिंद परांडे म्हणाले, जेएनयूत गैरप्रकार करणाऱ्यांसोबत दीपिका एकजूट दाखवत आहे का? आपण कोणत्या गटाच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत हे तिने स्पष्ट करावे.
भाजप खासदार साक्षी महाराजने दीपिका ही 'टुकडे-टुकडे गँग'ची सदस्य असल्याचे म्हटले आहे. भाजप प्रवक्ता तेजिंदरपाल बग्गा, रमेश बिधुरी यांनीही वक्तव्याचे समर्थन केले.
दुसरीकडे दीपिकाला बॉलीवूडमधून पाठिंबा मिळत असून कलाकारांनी तिच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.