Maharashtra Special / मुंबईतील 'या' हॉटेलने दोन उकडलेली अंडी आणि ऑमलेटसाठी लावले तब्बल 3400 रुपयांचे बील, ट्विटरवरुन उघडीस आली घटना

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोससोबत अशीच घटना घडली होती

दिव्य मराठी वेब

Aug 11,2019 09:42:36 PM IST

मुंबई- येथील "फोर सीजन्स" हॉटलने आपल्या एका ग्राहकाला दोन उकडलेली अंडी आणि दोन ऑमलेटसाठी चक्क 3400 रुपयांचे बील लावले आहे. कार्तिक धर नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटरवर हॉटेलचे बील पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीले," मुंबईच्या फोर सीजन्समध्ये दोन अंड्यांसाठी 1700 रुपये." याआधी, चंडीगडच्या "जेडब्ल्यू मॅरियॉट" हॉटलने अभिनेता राहुल बोसला दोन केळांसाठी तब्बल 442 रुपयांचे बील लावले होते. त्यानंतर चंडीगडच्या खाद्य विभागाने हॉटेलला 25 हजारांचा दंड लावला होता.

कार्तिकने राहुल बोसला ट्विटरवर टॅग करत लिहीले- "भाई आंदोलन करें?" हॉटलच्या बीलावर दोन उकडलेली अंडी आणि दोन ऑमलेटसाठी 3400 रुपयांची किंमत लिहीलेली होती. तुर्तास हॉटेलने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीये. एका युझरने ट्विटरवर कमेंट केली, "अंड्यासोबत सोने मिळाले होते का...?" दुसऱ्या युझरने लिहीले, "कोंबडी कोण्या श्रींमत व्यक्तीची असेल."

फेडरेशन ऑफ हॉटल रेस्टोरेंट ऑफ इंडियाने चुकी मान्य केली नव्हती
मागील महिन्यात अभिनेता राहुल बोससोबत अशीच घटना घडली होती. त्याला चंडीगडच्या जेडब्लू मॅरियॉट हॉटेलने दोन केळांसाठी 442 रुपयांचे बील लावले होते. यावर फेडरेशन ऑफ हॉटल अँड रेस्टोरेंट ऑफ इंडियाने हॉटेलची बाजू घेतली होती. ते म्हणाले की, "केळीला किरकोळ दराने खरेदी करता येते. त्यानंतर हॉटेल सर्विस, प्लेट, कटलरी इत्यादी उपलब्ध करुन देतात. रस्त्यावर एक कॉफी 10 रुपयांची मिळते, पण लक्झरी हॉटलमध्ये एका कॉफीची किंमत 250 रुपये असते. यात काहीच चुकीचे नाहीये." त्यानंतर चंडीगडच्या खाद्य विभागाने हॉटेलला शो कॉज नोटीस जारी करुन 25 हजारांचा दंड लावला होता.

X
COMMENT