आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai / महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या IAS अधिकारी निधी चौधरी यांची बदली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. सोबतच, राज्य सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांची स्मारके हटवण्यात यावी, नोटांवरून त्यांचा फोटो काढण्यात यावा अशी मागणी केली होती. एवढेच नव्हे, तर या ट्विटच्या शेवटी या अधिकाऱ्याने महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेला थँक्यू असे म्हटले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या विरोधानंतर अखेर निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

 


2012 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी असलेल्या निधी चौधरी मुंबई महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. गांधींच्या आठवणी मिटवून गोडसेला धन्यवाद म्हणणाऱ्या या अधिकाऱ्याचे ट्विट देशभर व्हायरल झाले. वाढता विरोध पहता निधी यांनी ते ट्विट डिलीट केले. यानंतर महात्मा गांधींना अभिवादन करताना काही फोटो शेअर केले. त्यामध्ये त्या गांधींच्या पुतळ्यासमोर आणि फोटोसमोर नतमस्तक होताना दिसून आल्या. तरीही त्यांनी आपला हेतू तसा नव्हताच असे म्हटले आहे. माझ्या ट्विटर अकाउंटला 2011 पासून फॉलो केले असते तर लोकांनाही गांधींविषयी माझी भक्ती दिसून आली असती असे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...