कोलकताचा पराभव करून मुंबई ठरली 'बाजीगर'
'बाजीगर' चित्रपटचा नायक शाहरुख खानच्या कोलकता नाईट रायडर्स संघाला नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाने ४ गड्यांनी पराभवाचा धक्का दिला.
-
मुंबई - 'बाजीगर' चित्रपटचा नायक शाहरुख खानच्या कोलकता नाईट रायडर्स संघाला नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाने ४ गड्यांनी पराभवाचा धक्का दिला. बिल्झर्ड (५१) आणि सचिन तेंडुलकरची (३६) शानदार फलंदाजी, सोबत मुनाफच्या भेदक माऱ्याच्या बळावर आपणच 'बाजीगर' असल्याचे मुंबईने सिद्ध केले. हरभजनसिंगने (नाबाद ११) सकिबूलच्या गोलंदाजीवर शानदार षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकत्याने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य मुंबईने अखेरच्या षटकात गाठले.
तत्पूर्वी, कोलकता नाईट रायडर्सकडून टेन डोयस्चेत याने ठोकलेल्या नाबाद ७० धावांच्या खेळीच्या बळावर या संघाने ७ बाद १४७ धावा ठोकल्या. कोलकता संघाची सुरुवात चांगली झाली नाही. या संघाने अवघ्या २ धावांत ४ विकेट गमाविल्या होत्या. यानंतर डोयस्चेत याने युसूफ पठाण आणि सकिबूल हसनसोबत केलेल्या खेळीने संघाचा डाव सावरला.
बिल्झर्ड-सचिनची अर्धशतकी भागीदारी गत सामन्याप्रमाणेच कोलकाता संघाला पराभवाची धूळ चारण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या सलामीच्या जोडीने कंबर कसली. सुरुवातच दमदार फटकेबाजीने करणा:या बिल्झर्ड-सचिन याजोडीने तुफानी फटकेबाजीचे प्रदर्शन केले. 29 चेंडूचा सामना करणा:या या जोडीने चौकार, षटकारांची आतषबाजी करत संघास 50 धावांच्या भागीदारीची सलामी दिली.अर्धशतकी भागीदारी करत या जोडीने संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
बिल्झर्डची अर्धशतकी खेळी
मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने वेळोवेळी फटकेबाजी करून महत्वपूर्ण साथ दिल्यामुळे सलामीच्या बिल्झर्डने मैदानावर आव्हान राखून चमकदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.